Ahmet Hamdi Tanpinar
म नः शां तीअहमत हमदी तानपिनार अनुवाद : सविता दामलेविविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी..मन:शांती या कादंबरीचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा. १९२० साली ओटोमन सत्तेची फाळणी झाल्यावर नवे सरकार स्थापन झाले. १९२० ते १९३० ह्या काळात तुर्कस्तानला आपली ओटोमन-मुस्लिम जुनी संस्कृती विसरून पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले, जुन्या तुर्की लिपीचा त्याग करून नवीन लॅटिन तुर्की भाषेचा स्वीकार करावा लागला. ह्या सगळ्या परिवर्तनातून जाणाऱ्या एका समाजातील मुमताझ ह्या तरुणाची आणि त्याच्या जीवनात आलेल्या माणसांची ही कहाणी आहे.अहमत हमदी तानपिनार हे ह्या कादंबरीचे लेखक स्वत: इस्तंबूल विद्यापीठात तुर्की वाङ्मयाचे प्राध्यापक होते. तुर्की शास्त्रीय संगीत, इतिहास, तत्त्वज्ञान ह्या सर्वच गोष्टींचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. नायक मुमताझ ह्याच्या तोंडून बरेचदा ते स्वत:च बोलत आहेत असे वाटते.बॉस्फरसच्या सामुद्रधनीचे, तेथील फेरीबोटीच्या प्रवासाचे आणि त्या फेरीतून होणाऱ्या नायकनायिकेच्या नयनरम्य भेटीगाठींचे वर्णन वाचून आपल्यालाही त्या प्रवासाला जावेसे वाटू लागते. इस्तंबूलचा बंदिस्त बाजार जवळ जवळ चारशेहून अधिक वर्षे जुना आहे. परिस्थिती खालावल्यामुळे मोठमोठ्या उमरावांकडून तिथे जुन्या संस्कृतीला बाजारात विकायला काढल्यामुळे नायकाला वाटणारी विषण्णत